नारायणगावजवळ भीषण अपघात, नऊ जणांचा जागीच मृत्यू

पुणे : पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघतात यात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे नारायणगाव जवळ हा अपघात आज सकाळी दहाच्या सुमारास झालाय. प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटो गाडीला पाठीमागून आयशर टेम्पो ने जोराची धडक दिली. चेंडू प्रमाणे ही मॅक्स ऑटो फेकली गेली. पुढं एक ब्रेक फेल झालेली एसटी रस्त्याच्या बाजूला उभी …

दादांच्या खांद्याला खांदा लावून मीच उभा , नसेल तर पहाटेचा शपथविधी आठवा : माणिकराव कोकाटे

बारामती: बारामती येथे कृषी प्रदर्शनाचे उदघाटन कार्यक्रमासाठी राज्यातील दिग्गज नेते उपस्थित होते. मात्र कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वक्तव्याची चांगलीच चर्चा होऊन सभागृहात एकाच हशा उडाल्याचे पाहायला मिळाले. लवकर उठून कामाला लागण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे. दादांना माहिती आहे मी उशिरा उठतो.दादांनी रात्रीच सांगितलं होतं.. उद्याच्या दिवस तसदी घ्यावी लागेल. तेव्हा मी त्यांना म्हटलं.. …

अभ्यास करत नसल्याच्या रागातून बापाने घेतला पोटच्या पोराचा जीव

पुणे : बारामती तालुक्यातुन एक धक्कादायक घटना समोर आहे. तु अभ्यास करत नाही, सारखा बाहेर खेळत असतो, तु तुझ्या आईच्या वळणावर जावून माझी इज्जत घालवणारा दिसतोय असे म्हणत बापाने पोटच्या नऊ वर्षीय पोराचे भिंतीवर डोके आपटून तसेच गळा दाबून खून आहे. या घटनेने बारामती तालुक्यात एकाच खळबळ उडाली आहे. पियुष विजय भंडलकर (वय ९) असे …

पुण्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये वाल्मिक कराडचा साडेतीन कोटींचा फ्लॅट 

पुणे : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडच्या गडगंज संपत्तीबाबत अनेक खुलासे समोर येत आहेत. पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवड मध्ये देखील वाल्मिक कराड याची संपत्ती आळस्याचे समोर आले आहे. उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहरात देखील वाल्मीक कराड आणि त्याच्या पत्नीच्या नावे वाकड मधील पार्क स्ट्रीट सोसायटीच्या आयव्हरी इमारतच्या 6 व्या मजल्यावर …

पानिपत शौर्य दिनानिमित्त मराठा वीरांना आदरांजली

पुणे: पानिपत युद्धाचा हा 265 वा स्मृतिदिन व पानिपतच्या युद्धात बलिदान देणाऱ्या मराठा वीरांना महादजी शिंदे छत्री, वानवडी येथे पानिपत शौर्य दिनानिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. त्याचप्रमाणे ग्वाल्हेरच्या महाराणी व ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या मातोश्री माधवीराजे सिंधिया यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . पानिपत शौर्य दिन कार्यक्रमाचे आयोजन उत्तमराव शिंदे सरकार यांच्यावतीने करण्यात …

दिल्ली येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या समारोपाला अजित पवार येणार

पुणे : सरहद, पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप समारंभास उपस्थित राहण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्य केले असून संमेलनाच्या यशस्वीतेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. 21 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत दिल्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी (तालकटोरा स्टेडियम) …

पुणे शहरात वाहतूक बदल, तात्पुरते आदेश जारी

पुणे : गणेशखिंड रोडवरील पुणे विद्यापीठ चौक ते शिवाजीनगर न्यायालयादरम्यान टाटा मेट्रोचे काम सुरू असून वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता वाहतूकीत तात्पुरत्या स्वरुपात बदलाबाबतचे आदेश पुणे शहर वाहतूक शाखेचे उप आयुक्त अमोल झेंडे यांनी जारी केले आहे. बाणेर कडुन शिवाजीनगर कडे जाणारी वाहतुक :- बाणेरकडून येणारी वाहतुक औध रोडवर वळवून राजभवन समोरील पंक्चर मधून …

आपल्या माणसांनी भरलेल्या घराची, दाभाडे कुटुंबाची इरसाल गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : टी -सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी यांच्या बहुप्रतीक्षित चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’चा जबरदस्त ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सोनू आणि कोमलच्या हळदी समारंभात धमाल केल्यानंतर आता दाभाडे कुटुंब ट्रेलर लाँचच्या निमित्ताने सगळ्यांच्या भेटीला आले. हा धमाकेदार ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला असून यावेळी दाभाडे कुटुंबियांकडून मीडियासह सगळ्या प्रेक्षकांना आग्रहाचे निमंत्रण होते. …

पारदर्शी व गतिमान शासन प्रतिमा निर्मितीसाठी महसूल यंत्रणेने कार्य करावे- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे : महसूल खाते शासनाचा चेहरा म्हणून ओळखले जाते. लोकाभिमुख प्रशासनासाठी महसूल यंत्रणेतील जिल्हाधिकारी यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी आठवड्यातील किमान दोन दिवस आपल्या कार्यक्षेत्रात ग्रामीण भागापर्यंत दौरे करावे आणि नागरिकांच्या प्रलंबित प्रकरणांचा आढावा घ्यावा आणि ती प्राधान्याने निर्गत करावी. महसूल यंत्रणेने आपली कार्यपद्धती गतिमान करून तत्परतेने जबाबदारी पार पाडावी ज्यायोगे नागरिकांमध्ये शासनाची पारदर्शी आणि …

विश्व मराठी संमेलनात मराठी भाषेच्या सर्व घटकांना समाविष्ट करण्यात येईल- उदय सामंत

पुणे : आगामी विश्व मराठी संमेलना च्या अनुषंगाने साहित्यिकांच्या सूचना जाणून घेण्यासाठी मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्याशी संवाद साधला. विश्व मराठी संमेलनात मराठी भाषेच्या सर्व घटकांना समाविष्ट करण्यात येईल, अशी ग्वाही सामंत यांनी यावेळी दिली. फर्ग्युसन महाविद्यालय येथे आयोजित या संवादास महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, महाराष्ट्र राज्य …