संस्कारक्षम समाज निर्मितीसाठी पालकांनी मुलांना वेळ देण्याची गरज : निवृत्ती महाराज इंदूरीकर यांचे प्रतिपादन

पुणे : समाजात आज विभक्त कुटुंब पद्धती वाढली आहे. शहर असो की ग्रामीण भाग पालकांना मुलांना देण्यासाठी पैसा आहे मात्र वेळ नाही. परिणामी मुलं, मुली नक्की काय करतात, त्यांचे मित्र – मैत्रिणी कसे आहेत याचा आई – वडिलांना पत्ता नसतो. आपलयांवर कोणाचे लक्ष नाही, कुणी आपल्याला काही बोलत नाही यातून युवा पिढीच्या मनामध्ये वाईट प्रवृत्ती …

वेल्हे तालुक्यातील शाळांना राज्य शिक्षण आयुक्तांची अचानक भेट, विविध योजना राबवण्याचे निर्देश

पुणे : राज्याचे शिक्षण आयुक्त श्री सचिद्र प्रताप सिंह यांनी सर्व शिक्षण संचालक, सहसंचालक व उपसंचालक यांना शनिवारचे औचित्य साधून “आनंददायी शनिवार ” या उपक्रमासह, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत शाळांना भेटी देण्याचे शुक्रवारी सायंकाळी निर्देश दिले होते. शिक्षण आयुक्त सचिद्र प्रताप सिंह यांनी स्वतः देखील आज शनिवारी दि. 18 रोजी पानशेत व परिसरातील …

चाळकवाडी येथे मराठी बालकुमार साहित्य संमेलन, सूर्यकांत सराफ असणार अध्यक्ष

परिसंवाद, कथाकथन, कथावाचनासह शालेय विद्यार्थ्यांचे रंगणार कविसंमेलन पुणे : सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत असलेल्या आणि बालसाहित्यातील मातृ संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणेतर्फे दि. 23 व दि. 24 जानेवारी रोजी मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे शिवांजली शैक्षणिक संकुल, चाळकवाडी-पिंपळवंडी, नारायणगाव (ता. जुन्नर) येथे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध बालसाहित्यिक ग. ह. पाटील …

हॉल तिकिटावर जातीचा नाही तर प्रवर्गाचा उल्लेख, अध्यक्ष शरद गोसाविनी दिले स्पष्टीकरण

पुणे : दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षाच्या हॉल तिकीटवर जातीचा उल्लेख करावा लागणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र याबाबत स्वतः माध्यमिक आणि उच्चं माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. गोसावी म्हणाले की, हॉल तिकिटावर जातीचा नाहीतर प्रवर्गाचा उल्लेख करण्यात येणार असल्याचे गोसावी यांनी सांगितले आहे. बारावीची परीक्षा येत्या 11फेब्रुवारीपासून सुरु …

शिक्षणमंत्री दादा भुसे action मोडवर, शिक्षण विभागाला महत्वाच्या सूचना

पुणे : मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार शिक्षण विभागाकरीता आखण्यात आलेल्या १० कलमी कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी; विभागाच्या अधिकाधिक सेवा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करण्याच्यादृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ येथे शालेय शिक्षण आयुक्तालयाच्या अधिनस्त असलेल्या विषयाबाबत आढावा बैठकीत त्यांनी सूचना दिल्या. यावेळी शिक्षण …

मराठी भाषा विभाग प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचण्याचे काम करावे : उदय सामंत यांच्या सूचना

पुणे: मराठी भाषा विभागाने मराठी भाषेचा गौरव वाढेल अशा पद्धतीने काम करतानाच हा विभाग प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने काम करावे, असे निर्देश मराठी भाषा मंत्री उदय सामंत व्यक्त केली. पिंपरी चिंचवड येथे मराठी भाषा विभाग आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागाचे सहसचिव नामदेव भोसले, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, मराठी …