पुण्यात विचित्र अपघात..! रिव्हर्स घेताना कार थेट भिंत तोडून कोसळली खाली

पुणे : पुणे तिथे काय उणे असे आपण नेहमी म्हणतो. पण दिवसेंदिवस पुणे आता वेगवेगळ्या घटनानांनी चर्चेत येत आहे. पुण्यात गुन्हेगारीचा आलेख देखील वाढताना पाहायला मिळत आहे. त्यातच एका विचित्र अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरलं झाला आहे. एका इमारतीच्या पहिल्या मजल्यानवरून गाडी मागे घेताना वाहन चालकाच्या एका चुकीमुळे गाडी मागे घेताना थेट पहिल्या मजल्यावरून …

बारामतीत हैदराबादच्या ११ कोटींच्या घोड्याची चर्चा, शेतकऱ्यांची व अश्वप्रेमींची बघण्यासाठी गर्दी

बारामती : आपण आपल्या आजूबाजूला अनेक कोट्यवधींच्या गाड्या बघतो लाखांपासून करोडो रुपयांपर्यंत गाड्या नागरिक खरेदी करतात. अगदी ग्रामीण भागात देखील या गया दिसू लागल्या आहेत. मात्र गाड्यांची किंमत अगदी फार तर तीन कोटीपर्यंत पोहचताहेत, म्हणजे निमशहरी भागातील उद्योजक तरी अशा गाड्या खरेदी करताना फार तर तीन कोटीपर्यंत खरेदी करतात, परंतु फक्त शौक म्हणून पाळलेल्या एखाद्या …

“मुक्काम पोस्ट देवाचं घर” चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च, सचिन पिळगावकर यांची उपस्थिती

पुणे :आपण पाठवलेलं पत्र अमेरिकेला पोहोचतं, तर देवाच्या घरी नक्की पोहोचेल असं वाटणाऱ्या एका लहान निरागस मुलीचा देवाच्या घराचा शोध “मुक्काम पोस्ट देवाचं घर” या चित्रपटातून उलगडणार आहे. हृदयस्पर्शी आणि मनोरंजक कथानक असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर लाँच नुकताच सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांच्या मुख्य उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आवर्जून …

पुण्यात मांजात अडकलेल्या घुबडाला अग्निशामक दलाकडून जीवदान

पुणे : पुण्यातील भांबुर्डा वनविभागात आज अग्निशमन दलाच्या जवानांनी झाडाच्या फांदीवर नायलॉन मांजामध्ये अडकलेल्या घुबडाला तत्परता दाखवत जीवदान दिले आहे. अग्निशमक दलाला याबाबत माहिती मिळाली असता अग्निशमक दलाचे निलेश महाजन आणि एरंडवना विभागाच्या सर्व जवानांनी आपल्या जीवाचे रान करत या घुबडाला जीवदान दिले आहे. यामुळे एरंडवणा येथील अग्निशमक दलाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्याचे कौतुक करण्यात …

राष्ट्रीय पाककृती स्पर्धेत पुण्याचा आयुष बिडवे बनला “मास्टर शेफ”

पुणे : आपण जे शिक्षण घेतो ते आपल्या आयुष्यात उपयोगी पडावे म्हणून युईआय ग्लोबल एज्युकेशन या “हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट” क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेने, देशातील ९ विविध शाखांमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी “युसीसी” राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले होते. यंदाच्या वर्षी या स्पर्धेचा सिझन २ लखनऊ येथे नुकताच संपन्न झाला. या स्पर्धेत युईआय ग्लोबलच्या देशभरातील शाखामधून १९० …

बोट अपघातात 13 जणांचा मृत्यू, 10 प्रवाशी, तीन कर्मचाऱ्यांचा समावेश

मुंबई : गेट वे ऑफ इंडियावरुन एलिफंटाच्या दिशेने जाणाऱ्या बोटीला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, निलकमल ही प्रवासी बोट गेट वे ऑफ इंडियावरुन 120 प्रवाशांना घेऊन एलिफंटाच्या दिशेने जात होती. या बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिल्याने हा अपघात झाला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, नौदलाच्या या स्पीड बोटीला नवीन इंजिन लावले होते. त्यामुळे समुद्रात त्याची त्याची चाचणी सुरू होती. मात्र त्याचवेळी या इंजिनमध्ये बिघाड झाला आणि बोटीवरील नियंत्रण सुटले आणि ही बोट प्रवासी बोटीला जाऊन धडकली. अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.

या दुर्देवी घटनेत 10 प्रवाशांचा आणि तीन नौदलाच्या बोटीवरील कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सुदैवाची बाब म्हणजे या अपघातातील 101 जणांचा वाचवण्यात यश आलं असल्याचे सांगण्यात आले आहे.