बीड हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला २८ डिसेंबर पर्यंत अटक करा 

बीड: बीडच्या मस्सजोग येथील संतोष देशमुख खून प्रकरणात तपास करण्याबाबत नागपूर येथील अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री यांनी जाहीर केले की जे कोण आरोपी असतील त्याला सोडले जाणार नाही. पण जो मूळ आरोपी आहे.जो मास्टरमाईंड आहे तो वाल्मीक कराड त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आला आहे. त्यांना खून प्रकरणात सहआरोपी करावे अशी आमची मागणी आहे.

मात्र त्यांना अद्याप अटक देखील झालेली नाही. यामुळे संपूर्ण बिडकर नागरिकांमध्ये रोष आहे. त्यामुळे येत्या 28 तारखेपर्यंत या प्रकरणात कारवाई झाली नाही तर बीड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला जाईल , अशी प्रतिक्रिया आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिली. बीडमध्ये आयोजित सर्वपक्षीय बैठकीनंतर संदीप क्षीरसागर यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आई तेव्हा “पांडुरंगा विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा ” असा देवाचा जप करत होती

बारामती: विधानसभेच्या निवडणूका नुकत्याचा पार पडल्या. त्यात सर्वात चर्चेत राहिलेला मतदार संघ म्हणजे बारामती. यात काका विरुद्व पुतण्या अशी या लढत पाहायला मिळाली. त्यात काका म्हणजे अजित पवार यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. यानिमित्ताने अजितदादा पवार यांचा बारामतीकरांच्या वतीने नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी भाषणा दरम्यान भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले.. या निवडणुकीच्या …

वाघोलीत मद्यधुंद डंपर चालकाने नऊ जणांना चिरडले, तिघांचा मृत्यू, सहा जण गंभीर

पुणे: पुण्यातील वाघोली येथील केसनंद जवळ फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना भरधाव डंपरने चिरडले असल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत तिघांचा जागेवर मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती अमेर आली आहे. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. विशाल विनोद पवार वय 22 वर्ष, रा. अमरावती मूळ जिल्हा, …

अजितदादा, धनंजय मुंडे यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करून त्यांना अटक करा, मराठा समाजाची मागणी

पुणे : बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग मध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी गुन्हेगारांचा नेता म्हणून धनंजय मुंडे यांची तात्काळ हकालपट्टी करून त्यांना अटक करावी अशी मागणी मराठा बांधवांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. याबाबतचे एक निवेदन समाजाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे. यावेळी ही मागणी केली आहे. अजितदादा पवार हे बारामती दौऱ्यावर होते. …

अखेर खाते वाटप जाहीर, गृह – फडणवीस, अर्थ -अजितदादा, नगरविकास – एकनाथ शिंदे

  मुंबई : हिवाळी अधिवेशन संपण्याच्या अगोदर राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर झाला आहे. यात ज्या खात्यावरून रस्सी खेच सुरु होते ते गृह खाते अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहिले असून तर नगरविकास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर अर्थ खाते अजितदादा पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. या मंत्री मंडळात तरुण वर्गाला संधी देण्यात आली आहे. मंत्र्यांना मिळालेली …

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर टोल माफी करा : आमदार  सुनिल शेळके

पुणे : पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी आणि अपघातांची समस्या लक्षात घेता जुन्या महामार्गावर आवश्यक त्या सर्व ठिकाणी उड्डाणपूल बांधावेत आणि संपूर्ण टोल माफी करावी, अशी आग्रही मागणी मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी विधानसभेत केली. वार्षिक पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना आमदार शेळके यांनी महामार्गांवरील अपुऱ्या सुविधांवर कठोर शब्दांत भाष्य केले. त्यांनी सांगितले की, रस्ते बांधणीसाठी शेकडो …

संतोष देशमुख हत्येतील मुख्य आरोपीचे एन्काऊंटर करणाऱ्यांना 51 लाखांचे बक्षीस, माढ्यातील शेतकऱ्याची घोषणा

सोलापूर : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण देशभर गाजत असताना सोलापूर जिल्ह्याच्या माढ्यातील एका शेतकऱ्याने सरपंचाची हत्या करणाऱ्या आरोपिंचे एनकाउंटर करणाऱ्यांना 51 लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. या घोषणा करणाऱ्या शेतकऱ्याची चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. माढ्यातील शेतकरी कल्याण बाबर असे घोषणा करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव असून त्यानुसार स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र तयार करून …

बीड हत्या प्रकरणात मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर, मास्टरमाईंडला सोडणार नाही

नागपूर : राज्यात बीड जिल्ह्यातील मस्सजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने खळबळ उडवली होती. त्यांची ज्या प्रकारे हत्या करण्यात आली. त्यावरून बीड जिल्ह्यात अराजक माजले असल्याचे पाहायला मिळाले. याबाबत राज्यसरकारने कडक कारवाईचे आश्वासन देत विधानसभेत आज निवेदन सादर केले. यात बिडच्या पोलीस अधीक्षकांवर कारवाई केली आहे. तसेच एपिंची तात्काळ बदली करण्याचे देखील त्यांनी …

ताम्हिणी घाटात खाजगी बस पलटी, ५ जणांचा मृत्यू तर ३५ जखमी

पुणे : मुळशी तालुक्यतील ताम्हिणी घाट परिसातून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पुणे दिघी महामार्गावर ताम्हिणी घाटात असणाऱ्या मौजे कोंडेथर गावच्या हद्दीत खाजगी बस पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे. या अघापघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून ३५ जण जखमी झाले आहेत. अशी ,माहिती स्थानिक नागरिकांकडून देण्यात आली …

पुण्यात कोयता गॅंगची दहशत, गाड्या फोडल्या, नागरिकांत दहशत

पुणे : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी डोके वर काढू लागली आहे. दिवसेंदिवस खून , चोरी ,दरोडा अशा अनेक घटना पुण्यासारख्या मेट्रो शहरात घडत आहेत. त्यात पुन्हा एकदा पुण्याच्या पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत कोयता गॅंगने  आज पहाटेच्या सुमारास गाड्या फोडल्याची घटना समोर आली आहे. पूर्व वैमनस्यातून या गाड्या फोडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कोयता गँगची दहशत …