“सेलिब्रिटी मास्टर शेफ” मध्ये निक्की आणि गौरवमध्ये खडाजंगी

मुंबई : 27 जानेवारी पासून या वर्षाची खाद्य दंगल बघण्यासाठी सज्ज व्हा, कारण सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे, एक चविष्ट रियालिटी शो ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ – सबकी सीटी बजेगी”. हा सीझन दर सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता प्रसारित होणार आहे. फराह खान या सीझनची होस्ट आहे, तर रणवीर ब्रार आणि विकास खन्ना …

“मुक्काम पोस्ट देवाचं घर” चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च, सचिन पिळगावकर यांची उपस्थिती

पुणे :आपण पाठवलेलं पत्र अमेरिकेला पोहोचतं, तर देवाच्या घरी नक्की पोहोचेल असं वाटणाऱ्या एका लहान निरागस मुलीचा देवाच्या घराचा शोध “मुक्काम पोस्ट देवाचं घर” या चित्रपटातून उलगडणार आहे. हृदयस्पर्शी आणि मनोरंजक कथानक असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर लाँच नुकताच सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांच्या मुख्य उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आवर्जून …

चाळकवाडी येथे मराठी बालकुमार साहित्य संमेलन, सूर्यकांत सराफ असणार अध्यक्ष

परिसंवाद, कथाकथन, कथावाचनासह शालेय विद्यार्थ्यांचे रंगणार कविसंमेलन पुणे : सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत असलेल्या आणि बालसाहित्यातील मातृ संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणेतर्फे दि. 23 व दि. 24 जानेवारी रोजी मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे शिवांजली शैक्षणिक संकुल, चाळकवाडी-पिंपळवंडी, नारायणगाव (ता. जुन्नर) येथे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध बालसाहित्यिक ग. ह. पाटील …

हॉल तिकिटावर जातीचा नाही तर प्रवर्गाचा उल्लेख, अध्यक्ष शरद गोसाविनी दिले स्पष्टीकरण

पुणे : दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षाच्या हॉल तिकीटवर जातीचा उल्लेख करावा लागणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र याबाबत स्वतः माध्यमिक आणि उच्चं माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. गोसावी म्हणाले की, हॉल तिकिटावर जातीचा नाहीतर प्रवर्गाचा उल्लेख करण्यात येणार असल्याचे गोसावी यांनी सांगितले आहे. बारावीची परीक्षा येत्या 11फेब्रुवारीपासून सुरु …

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसंपदा विभागाचा पुढाकार, नदीजोड प्रकल्प पूर्ण करण्यावर भर

पुणे : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी समर्पित भावनेने काम करावे, असे आवाहन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. विभागासाठी सध्याची आर्थिक तरतूद पाहता प्रस्तावित नदीजोड प्रकल्प पूर्ण होण्यास 20 ते 25 वर्षे लागू शकतील असे प्रकल्प पाच वर्षात पूर्ण होण्याच्या दृष्टीने विविध पर्यायांद्वारे निधी उभारण्याचा विचार आहे; निधीची कोणत्याही प्रकारे कमतरता भासणार नाही, …

शिक्षणमंत्री दादा भुसे action मोडवर, शिक्षण विभागाला महत्वाच्या सूचना

पुणे : मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार शिक्षण विभागाकरीता आखण्यात आलेल्या १० कलमी कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी; विभागाच्या अधिकाधिक सेवा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करण्याच्यादृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ येथे शालेय शिक्षण आयुक्तालयाच्या अधिनस्त असलेल्या विषयाबाबत आढावा बैठकीत त्यांनी सूचना दिल्या. यावेळी शिक्षण …

दिव्यांगांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी सरकार कटिबद्ध-उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : ‘दिव्यांग बांधव हा समाजाचा अविभाज्य घटक असून दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी, त्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम शासन करेल. त्यासाठी विविध घटकांच्या सहकार्याने प्रभावी उपायोजना करण्यात येतील.’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. दिव्‍यांग बांधवांना समाजाच्‍या मुख्‍य प्रवाहात आणून त्‍यांचे सक्षमीकरण करण्‍याच्‍या उद्देशाने पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन यांच्या वतीने …

नारायणगावजवळ भीषण अपघात, नऊ जणांचा जागीच मृत्यू

पुणे : पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघतात यात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे नारायणगाव जवळ हा अपघात आज सकाळी दहाच्या सुमारास झालाय. प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटो गाडीला पाठीमागून आयशर टेम्पो ने जोराची धडक दिली. चेंडू प्रमाणे ही मॅक्स ऑटो फेकली गेली. पुढं एक ब्रेक फेल झालेली एसटी रस्त्याच्या बाजूला उभी …