पुण्याचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा राज्याला दिशादर्शक ठरेल असा करा : प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील 

पुणे : पुणे जिल्ह्याचे भौगोलिक व औद्योगिक क्षेत्र, वाढते नागरीकीकरण तसेच आपत्तीच्यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी त्यानुसार असणारा जलद प्रतिसाद याकरीता लागणारी साधने याबाबींचा सर्वांगिण विचार करता सर्व विभागाचा सहभाग घेत राज्याकरीता दिशादर्शक ठरेल, यास्वरुपाचा आदर्श आपत्ती व्यवस्थापन आराखडा निर्माण करावा, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी दिले. …