दावोसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रूरल एन्हान्सर्सचा १० हजार कोटी गुंतवणुकीचा करार
पुणे : दावोसमधील (स्वित्झर्लंड) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र शासनाने पुण्यातील रूरल एन्हान्सर्स संस्थेशी १० हजार कोटींच्या गुंतवणुकीचा क्रेडिट लाईन सामंजस्य करार केला. आरोग्यसेवा, रुग्णालय, पायाभूत सुविधा, बंदरे व सामाजिक क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी हा सामंजस्य करार महत्वपूर्ण असून, मुख्यमंत्री फडणवीस व संस्थेचे प्रमुख अंबर आयदे यांनी करार आदानप्रदान केला. महाराष्ट्रातील स्टार्टअपसाठी, तसेच …