सभागृहात नेत्यांची भांडणे नळावरील भांडणासारखी : रोहीत पवार

पुणे : पत्रकाराच्या लेखणीप्रमाणे व्यंगचित्रकाराच्या कुंचल्यात ताकद आहे. यामुळेच राजकारणी व्यंगचित्र प्रदर्शनास भेट देण्याचे टाळतात, असे वाटते. राजकीय, सामाजिक प्रश्नांवरील व्यंगचित्रांचा संदर्भ देऊन मार्मिक टिप्पणी करताना आमदार रोहित पवार म्हणाले, चित्रात दर्शविल्याप्रमाणे पाणी वाया घालवून महिला मात्र नळकोंड्यावर भांडणे करीत आहेत, त्याप्रमाणे सभागृहात आम्ही राजकारणी मंडळी विकासाचा मुद्दा बाजूला सारून विरोधासाठी विरोध करताना किंवा नेत्याला …

वेल्हे तालुक्यातील शाळांना राज्य शिक्षण आयुक्तांची अचानक भेट, विविध योजना राबवण्याचे निर्देश

पुणे : राज्याचे शिक्षण आयुक्त श्री सचिद्र प्रताप सिंह यांनी सर्व शिक्षण संचालक, सहसंचालक व उपसंचालक यांना शनिवारचे औचित्य साधून “आनंददायी शनिवार ” या उपक्रमासह, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत शाळांना भेटी देण्याचे शुक्रवारी सायंकाळी निर्देश दिले होते. शिक्षण आयुक्त सचिद्र प्रताप सिंह यांनी स्वतः देखील आज शनिवारी दि. 18 रोजी पानशेत व परिसरातील …