पुण्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये वाल्मिक कराडचा साडेतीन कोटींचा फ्लॅट 

पुणे : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडच्या गडगंज संपत्तीबाबत अनेक खुलासे समोर येत आहेत. पुण्यानंतर आता पिंपरी चिंचवड मध्ये देखील वाल्मिक कराड याची संपत्ती आळस्याचे समोर आले आहे. उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहरात देखील वाल्मीक कराड आणि त्याच्या पत्नीच्या नावे वाकड मधील पार्क स्ट्रीट सोसायटीच्या आयव्हरी इमारतच्या 6 व्या मजल्यावर …

सतीश वाघ हत्या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम पोलिसांनी आणला समोर

पुणे : सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात त्यांची पत्नी मोहिनी वाघ यांनीच या हत्येचा कट रचला माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. मोहिनी वाघ हिचे या खुनातील मुख्य आरोपी आणि त्यांच्या मुलाचा मित्र असलेल्या अक्षय जवळकर याच्याशी अनैतिक संबंध होते. त्यातूनच ही हत्या झाल्याचे तपासात समोर आले आहे. सहा महिन्यांपूर्वीच तिने आपल्या पाटील यांना मारण्याचा …

ब्रेकिंग..!सतीश वाघ हत्याप्रकरणात धक्कादायक ट्विस्ट, पत्नीनेच दिली हत्येची सुपारी, प्रेमसंबंधातून घडली घटना

पुणे : काही दिवसापूर्वी एका हत्येने पुणे हदराले होते. भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाची हत्या अपहरण करून करण्यात आली. मात्र आता या घटनेत मोठा ट्वि्स्ट आला आहे. टिळेकर यांच्या मामाची हत्या त्यांच्या मामीने म्हणजे सतीश वाघ याच्या पत्नीनेच केली असल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून पत्नीला अटक करण्यात आले आहे. 9 डिसेंबरच्या सकाळी पहाटे साडेसहाच्या …

बीड हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला २८ डिसेंबर पर्यंत अटक करा 

बीड: बीडच्या मस्सजोग येथील संतोष देशमुख खून प्रकरणात तपास करण्याबाबत नागपूर येथील अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री यांनी जाहीर केले की जे कोण आरोपी असतील त्याला सोडले जाणार नाही. पण जो मूळ आरोपी आहे.जो मास्टरमाईंड आहे तो वाल्मीक कराड त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आला आहे. त्यांना खून प्रकरणात सहआरोपी करावे अशी आमची मागणी आहे.

मात्र त्यांना अद्याप अटक देखील झालेली नाही. यामुळे संपूर्ण बिडकर नागरिकांमध्ये रोष आहे. त्यामुळे येत्या 28 तारखेपर्यंत या प्रकरणात कारवाई झाली नाही तर बीड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला जाईल , अशी प्रतिक्रिया आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिली. बीडमध्ये आयोजित सर्वपक्षीय बैठकीनंतर संदीप क्षीरसागर यांनी माध्यमांशी संवाद साधला.