“मुक्काम पोस्ट देवाचं घर” चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च, सचिन पिळगावकर यांची उपस्थिती

पुणे :आपण पाठवलेलं पत्र अमेरिकेला पोहोचतं, तर देवाच्या घरी नक्की पोहोचेल असं वाटणाऱ्या एका लहान निरागस मुलीचा देवाच्या घराचा शोध “मुक्काम पोस्ट देवाचं घर” या चित्रपटातून उलगडणार आहे. हृदयस्पर्शी आणि मनोरंजक कथानक असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर लाँच नुकताच सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांच्या मुख्य उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आवर्जून …

लोकशाहीर पठ्ठे बापूराव ह्यांच्या सुनेचा एकमेव कायदेशीर वारस असल्याचा दावा

पुणे : विसाव्या शतकाचा कालखंड म्हणजे तमाशाचा सुवर्णकाळ. पठ्ठे बापूराव नावाचे ‘मिथक’ निर्माण झाले ते याच कालखंडात. लावण्यांचे विद्यापीठ असलेल्या या शाहिराची सांगीतिक यशोगाथा मराठी रुपेरी पडद्यावर येणार असतानाच ‘लोकशाहीर पठ्ठे बापूराव’ यांच्या सुनेने श्रीमती नलिनी गोविंद कुलकर्णी यांनी श्री श्रीधर कृष्णा कुलकर्णी तथा लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांच्या सर्व गोष्टींच्या एकमेव कायदेशीर वारस असल्याचे सांगितले …

सुरज चव्हाण याचा “राजराणी” चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, प्रदर्शन थांबवण्याची मागणी

पुणे : बिग बॉस विजेता सुरज चव्हाण याचा नुकताच प्रदर्शित झालेला राजा राणी हा चित्रपट समाजासाठी घातक असून यान चित्रपटातून समाजामध्ये चुकीचा संदेश जात आहे म्हणून त्या चित्रपटावर तात्काळ बंदी घालावी नाहीतर न्यायालयाचे दरवाजे ठोठाहून चित्रपटावर कायदेशीररित्या बंदी घातली जाईल असा निर्वाळीचा इशारा प्रसिद्ध ॲड. वाजिद खान (बिडकर) यांनी  श्रमिक पत्रकार भवन या ठिकाणी आयोजित …