लाडक्या बहिणींसाठी गुड news..! लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

नागपूर : ज्या योजनेमुळे महायुतीला भरघोस असे यश मिळाले, ती लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी दिली. नागपूर येथे हिवाळी अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात त्यांनी ही माहीती दिली. तसेच लाडकी बहीण योजनेची रक्कम अधिवेशन संपल्यानंतर डिसेंबर महिन्यातच मिळणार असल्याचे देखील त्यांनी नमूद केले. आम्ही सूरू केलेली एकही कल्याणकारी योजना …

बोट अपघातात 13 जणांचा मृत्यू, 10 प्रवाशी, तीन कर्मचाऱ्यांचा समावेश

मुंबई : गेट वे ऑफ इंडियावरुन एलिफंटाच्या दिशेने जाणाऱ्या बोटीला झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, निलकमल ही प्रवासी बोट गेट वे ऑफ इंडियावरुन 120 प्रवाशांना घेऊन एलिफंटाच्या दिशेने जात होती. या बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिल्याने हा अपघात झाला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, नौदलाच्या या स्पीड बोटीला नवीन इंजिन लावले होते. त्यामुळे समुद्रात त्याची त्याची चाचणी सुरू होती. मात्र त्याचवेळी या इंजिनमध्ये बिघाड झाला आणि बोटीवरील नियंत्रण सुटले आणि ही बोट प्रवासी बोटीला जाऊन धडकली. अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.

या दुर्देवी घटनेत 10 प्रवाशांचा आणि तीन नौदलाच्या बोटीवरील कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सुदैवाची बाब म्हणजे या अपघातातील 101 जणांचा वाचवण्यात यश आलं असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी मावळातील तरुणांचे अनोखे साहस

८०० फुटांवरुन झळकावला तीस फुटी बॅनर मावळ : अजितदादा पवार मुख्यमंत्री व्हावे यासाठी मावळातील तरुणांनी अनोख्या पद्धतीने लक्ष वेधले आहे. अजितदादा पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत व मावळचे आमदार सुनिल शेळके यांना मंत्रीमंडळात स्थान मिळावे अशा आशयाचा तीस फुटाचा मोठा बॅनर ८०० फुट उंचीच्या नागफणी कड्यावरून झळकावून सर्वांचे लक्ष वेधले आहे.राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला …

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार मुरलीधर मोहोळ? नंतर स्वतःच दिले स्पष्टीकरण

पुणे : राज्याच्या राजकारणात महायुती सरकार संपूर्ण ताकतीनिशी यश मिळवल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणारा अशी चर्चा सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असताना आता आणखी एका नावाची चर्चा सुरु झाली आहे. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची चर्चा आता मुख्यमंत्री पदासाठी सुरू झाली आहे. मात्र …