पुण्याचे जिल्हाधिकारी बदलले…! जितेंद्र डुडी सांभाळणार कार्यभार, सुहास दिवसे यांची बदली

पुणे : राज्यात महायुतीचे सरकार आल्याने प्रशासनात मोठे फेरबदल केले जातं आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे हे पूजा खेडकर प्रकरणामुळे चांगलेच चर्चेत आले होते. संपूर्ण राज्यात त्याची चर्चा झाली होती. मात्र आता पुण्याचे जिल्हाधिकारी असलेले डॉ. सुहास दिवसे यांची आता बदली करण्यात आली आहे. त्यांना आता जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख, पुणे या …

पुण्याचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा राज्याला दिशादर्शक ठरेल असा करा : प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील 

पुणे : पुणे जिल्ह्याचे भौगोलिक व औद्योगिक क्षेत्र, वाढते नागरीकीकरण तसेच आपत्तीच्यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी त्यानुसार असणारा जलद प्रतिसाद याकरीता लागणारी साधने याबाबींचा सर्वांगिण विचार करता सर्व विभागाचा सहभाग घेत राज्याकरीता दिशादर्शक ठरेल, यास्वरुपाचा आदर्श आपत्ती व्यवस्थापन आराखडा निर्माण करावा, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी दिले. …

शस्त्रपरवाना धारकांकडील पावणेचार हजार शस्त्रे जमा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे : विधानसभा निवडणूका शांततामय वातावरणात व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीमध्ये जिल्ह्यातील ३३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ३ हजार ६७७ शस्त्रपरवाना धारकांकडील ३ हजार ७६१ शस्त्रे जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. हे आदेश जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणूक असलेल्या सर्व विधानसभा मतदार संघाच्या संपूर्ण क्षेत्रात अंमलात राहतील. निवडणूक कालावधीमध्ये शस्त्र …