बोपोडी येथे मोफत नेत्र तपासणी व नेत्र शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

पुणे : पुण्याच्या माजी उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर मित्रपरिवार आणि रोटरी क्लब ऑफ पुना डाऊनटाऊन , एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व नेत्र शस्त्रक्रिया शिबिर आज बोपोडी येथे सम्यक विहार व विकास केंद्र या ठिकाणी संपन्न झाले. या शिबिरात ६०० हून अधिक नागरिकांनी नेत्र तपासणी चा लाभ घेतला …