सोनसाखळी चोरांवर जरब बसवा, भाजपा कोथरूड मंडलाची पोलिसांना निवेदनाद्वारे मागणी

पुणे : कोथरूड आणि कर्वेनगरमध्ये सोनसाखळी चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. कोथरूडमध्ये, मॉर्निंग वॉकसाठी जात असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी चोरले, तर कर्वेनगरमध्ये एका सोसायटीत घुसून चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. या घटनांमुळे पुण्यातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, सोनसाखळी चोरांवर जरब बसविण्याची मागणी भाजप कोथरुड मंडलाच्या वतीने आज करण्यात आली. भाजपा कोथरूड मंडलाच्या …