बीड: बीडच्या मस्सजोग येथील संतोष देशमुख खून प्रकरणात तपास करण्याबाबत नागपूर येथील अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री यांनी जाहीर केले की जे कोण आरोपी असतील त्याला सोडले जाणार नाही. पण जो मूळ आरोपी आहे.जो मास्टरमाईंड आहे तो वाल्मीक कराड त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आला आहे. त्यांना खून प्रकरणात सहआरोपी करावे अशी आमची मागणी आहे.
मात्र त्यांना अद्याप अटक देखील झालेली नाही. यामुळे संपूर्ण बिडकर नागरिकांमध्ये रोष आहे. त्यामुळे येत्या 28 तारखेपर्यंत या प्रकरणात कारवाई झाली नाही तर बीड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला जाईल , अशी प्रतिक्रिया आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिली. बीडमध्ये आयोजित सर्वपक्षीय बैठकीनंतर संदीप क्षीरसागर यांनी माध्यमांशी संवाद साधला.