शस्त्रपरवाना धारकांकडील पावणेचार हजार शस्त्रे जमा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे : विधानसभा निवडणूका शांततामय वातावरणात व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीमध्ये जिल्ह्यातील ३३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ३ हजार ६७७ शस्त्रपरवाना धारकांकडील ३ हजार ७६१ शस्त्रे जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. हे आदेश जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणूक असलेल्या सर्व विधानसभा मतदार संघाच्या संपूर्ण क्षेत्रात अंमलात राहतील. निवडणूक कालावधीमध्ये शस्त्र …