लोकशाहीर पठ्ठे बापूराव ह्यांच्या सुनेचा एकमेव कायदेशीर वारस असल्याचा दावा

पुणे : विसाव्या शतकाचा कालखंड म्हणजे तमाशाचा सुवर्णकाळ. पठ्ठे बापूराव नावाचे ‘मिथक’ निर्माण झाले ते याच कालखंडात. लावण्यांचे विद्यापीठ असलेल्या या शाहिराची सांगीतिक यशोगाथा मराठी रुपेरी पडद्यावर येणार असतानाच ‘लोकशाहीर पठ्ठे बापूराव’ यांच्या सुनेने श्रीमती नलिनी गोविंद कुलकर्णी यांनी श्री श्रीधर कृष्णा कुलकर्णी तथा लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांच्या सर्व गोष्टींच्या एकमेव कायदेशीर वारस असल्याचे सांगितले …