सोलापूर : दारूचे व्यसन हे संसार उद्धस्त करत. अनेकांना आपले जीव देखील या दारुमुळे गमवावे लागले आहेत. अनेकांनाच्या किडन्या फेल देखील झाल्या आहेत. मात्र कोंबड्या याला अपवाद ठरल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात कोंबड्या चक्क देशी दारू पिऊन रोगमुक्त झाल्या आहेत. कोंबड्यामध्ये मर नावाचा साथीचा आजार आला आहे. या कोंबड्यांना मर रोगापासून वाचवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात असणाऱ्या वाळूज या गावातील एका कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्याने हा आगळावेगळा प्रयोग केला आहे. त्याच्या या प्रयोगाची चांगलीच चर्चा होऊ लागली आहे.
विशेष म्हणजे या शेतकऱ्याने केलेल्या प्रयोगामुळे कोंबड्याचा जीव वाचला असल्याचे शेतकरी राजेंद्र कादे यांनी दिली आहे. मागच्या तीन महिन्यापासून हा दारू पाजण्याचा प्रयोग केल्याने या कोंबड्याचा जीव वाचल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे बेवड्या कोंबड्यांची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा रंगली आहे.
यावेळी माहिती देताना राजेंद्र कादे म्हणाले की, माझ्याकडे दोन एकर शेती आहे. शेतीला काही तरी जोडधंदा असावा म्हणून कुकूट पालानाचा व्यवसाय सुरु केला. त्यांनी कावेरी जातीच्या शंभर हुन अधिक कोंबड्या विकत घेतल्या होत्या. साथीचा रोग आल्याने त्यातील 20 हुन अधिक कोंबड्यांचा मृत्यू झाला.
*कशी सुचली कल्पना*
कुकुट पालनाचा व्यवसाय करताना कोंबड्याचा मृत्यू होत होता. त्यावर गावतील एका व्यक्तीने देशी दारूचा डोस देण्याचा सल्ला दिला. त्यानुसार राजेंद्र कादे यांनी आपल्या कोंबड्याना साथीच्या रोगापासून वाचवण्यासाठी देशी दारू पिण्याच्या पाण्यात टाकली. दारू पिल्याने काही दिवसानंतर साथीच्या रोगापासून सर्व कोंबड्या मुक्त झाल्या असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मागील तीन महिन्यात एकही कोंबडी दगावली नाही आणि सर्व कोंबड्या निरोगी असल्याची माहिती शेतकऱ्याने दिली आहे. त्यामुळे कोंबड्याना महिन्यातून दोन ते तीन वेळा दारूचे डोस हा शेतकरी देत आहे.
त्यामुळे देशी दारू पिणाऱ्या कोंबड्या अशी चर्चा देखील संपूर्ण राज्यभर सुरु झाली आहे.
Leave a Reply