पुणे : छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जगभरात पोहचवण्यासाठी हिंदी चित्रपट छावा येत आहे. विकी कौशल आणि रश्मीका मंदाना यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या आहेत. मात्र हा चित्रपट एका वेगळ्या कारणनेच चर्चेत आला आहे. तो म्हणजे या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई साहेब या लेझीम नृत्य करताना पाहायला मिळत आहे.
याबाबत आता अनेक चर्चना उधाण आले आहे. यावर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून, फक्त ट्रेलर पाहून चित्रपटात नेमकं काय आहे, याचा पूर्ण अंदाज बांधणं कठीण आहे. ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई साहेब या लेझीम नृत्य करताना पाहायला मिळत आहे. हे आपलं पारंपरिक नृत्य आहे आणि या चित्रपटात या नृत्याची पेरणी नेमकी कशा अर्थाने करण्यात आलीये, या मागचा उद्देश नेमका काय? हे चित्रपट पाहिल्या शिवाय लक्षात येणार नाही. अशी प्रतिक्रिया अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली आहे.
डॉ. अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहचवला आहे. यावेळी अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका मांडली आहे. आम्ही स्वराज्य रक्षक मालिका साकारताना छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाला गालबोट लागणार नाही, याची खबरदारी आम्ही घेतली होती. तशीच माझी अपेक्षा आहे की छावाच्या संपूर्ण टीमने ही याची खबरदारी घेतली असेल आणि ही अपेक्षा पूर्ण झाली असेल तर छोट्या गोष्टीवरून वादंग निर्माण करण्याची आवश्यकता नाही, असं मला व्यक्तिगत वाटतं असल्याचे कोल्हे म्हणालेत.
तसेच आपल्या महाराजांचा दैदिप्यमान इतिहास हा हिंदी चित्रपटातून जगासमोर येत असेल तर त्यावर आक्षेप घेण्यापेक्षा आपण पाठिंबा देणं गरजेचं आहे, यामुळं यापुढं ही आपल्या महाराजांचा इतिहास जगासमोर येत राहील असे देखील त्यांनी सांगितले आहे.
Leave a Reply