पुणे : मावळचे आमदार सुनील शेळके हे वडगाव शहरात जनसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून तालुक्यात नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत याचदरम्यान दौरा वडगाव शहरात असताना नागरिकांशी संवाद चालू असताना आमदार शेळकें यांनी याभागात चालू असलेल्या मटका अड्डयावरही छापा मारला
याशिवाय शहरातील वाढती गुन्हेगारी व तरुणांमध्ये वाढणाऱ्या व्यसनांच्या प्रमाणाला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनास सूचना दिल्या असुन नागरिकांनी देखील जागरूक राहण्याबाबत आमदार शेळके यांनी विनंती केली. आमदार शेळके यांच्या समवेत संवाद साधण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दरम्यान प्रत्येक व्यक्तीची तक्रार जाणून घेऊन जागेवरच त्याचे निरसन करत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. रेशनिंग धान्य, शासकीय योजना, विविध दाखले, रेशनकार्ड या संदर्भातील नागरिकांच्या प्रश्नांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना शेळके यांनी चांगलेच धारेवर धरले.
केशवनगर भागात दौरा सुरू असताना नागरिकांनी रेल्वे लाईनच्या बाजूला मटका अड्डा सुरू असल्याने खूप त्रास होत असल्याच्या तक्रारी आमदार शेळके यांच्याकडे मांडल्या. त्यामुळे आमदार शेळके यांनी थेट ताफ्यासह मटका अड्ड्यावर जावून मटका अड्डा चालवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांसमोर रंगेहाथ पकडुन पोलिसांच्या स्वाधीन केले. यानंतर प्रभाग ४ मध्ये सुरू असलेल्या दारूच्या अड्डयावरही त्यांनी छापा टाकला.
Leave a Reply