Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

धनंजय मुंडेंकडे असलेल्या मंत्रिपदामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट ; संदीप क्षीरसागर यांचा आरोप

जालना : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. अनेक जण त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी त्यांची भेट घेत आहेत. त्यात बीडमधील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जरांगे यांच्या तब्बेतीची विचारपूस करून त्यांना काळजी घेण्याचं आवाहन केल आहे.

जालना येथे माध्यमांशी आज ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी अनेक विषयांवर देखील भाष्य केले.

तसेच धनंजय मुंडेंकडे असलेल्या मंत्रिपदामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना संरक्षण आणि व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जात असल्याचा आरोप क्षीरसागर यांनी केला आहे. तसेच मनोज जरांगेंनी सरकारकडे बोलण्याची जबाबदारी द्यावी, आम्ही जबाबदारी पार पाडू, असंही यावेळी क्षीरसागर यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »