पुणे : रस्ता सुरक्षा महिना अभियानांतर्गत “अणेवाडी टोल प्लाझा व खेड शिवापूर टोल प्लाझा” या ठिकाणी मोफत डोळे व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 200 हून अधिक नागरिकांना मोफत डोळे व आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने टोल प्लाझावरील कर्मचारी आणि ट्रक चालक यांनी या शिबिराचा लाभ घेतला.
या कार्यक्रमाचे ओपनिंग रिजनल हेड वेस्ट झोन अमित भाटिया यांचा हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमावेळी प्रमुख अतिथी प्रकल्प संचालक संजय कदम, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण वारजे पुणे, तसेच LN मालविया चे टीम लीडर श्री परमेश्वर आरवाटकर, अनंत कुलकर्णी, टोल प्लाझा वरील अधिकारी बद्रिप्रसाद शर्मा , राकेश कोळी, सचिन जैन, अभिजीत गायकवाड, मोहन धुमाळ, संकेत गांधी, रघुवीर सिंग, संदीप कोंडे, आकाश चोरगे, प्रशांत भोसले महामार्ग सहाय्यक पोलिस निरिक्षक विनायक कापसे व इतर सहकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Leave a Reply