विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. दिल्ली काबीज करण्यासाठी पंतप्रधान मोदींसह सर्वच पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. मात्र, गोंडा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व उमेदवारांना मंचावर निमंत्रित करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत होते. मात्र एका उमेदवाराच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या भेटीने सर्वांचेच लक्ष वेधले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक कृती चर्चेचा विषय ठरू लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी चक्क उमेदवाराच्या पाया पडताना पाहायला मिळत आहेत.
याबाबत एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहिती नुसार,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक एक उमेदवार मंचावर येऊन भेटत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वांशी हस्ताआंदोलन करत होते. यावेळी मोदींनी तिथे आलेल्या एका उमेदवाराला तीन वेळा वाकून नमस्कार केला. पंतप्रधान मोदींच्या या कृतीने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरलं झाला आहे. या उमेदवाराचे नाव काय? असा प्रश्न सर्वांनाच त्यावेळी पडला होता. तर त्याचे नाव
पटपडगंज विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार रवींद्र सिंह नेगी असे त्यांचे नाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या पाया का पडले असा प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र त्यानंतर अनेकांना पाय पडण्यापासून रोखण्यात आले.
कोण आहेत नेगी?
पटपडगंज विधानसभेच्या विनोदनगर येथील नगरसेवक आहे रवींद्र सिंह नेगी. रवींद्र सिंह नेगी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वादग्रस्त कृतीमुळे चर्चेत आहेत. त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर त्यांनी काही व्हिडीओ शेअर केले होते, ज्यामुळे वाद उद्भवला. पश्चिम विनोद नगर येथे असलेल्या एका डेअरीच्या समोर उभे राहून नेगी यांनी डेअरी चालकाला धमकावले होते. अल्तमश तोमर नामक मालकाच्या डेअरीचे नाव फक्त तोमर ठेवण्यात आले होते. नेगींचे म्हणणे होते की, तुमचे पहिले नाव जे काही असेल, तेही दुकानावर दिसले पाहीजे. फक्त तोमर लिहून चालणार नाही. जर पूर्ण नाव दुकानावर लिहिले नाही तर दुकान बंद करू, अशीही धमकी त्यांनी दिली होती. नेगी यांनी
हिंदू फेरीवाल्यांनाही आवाहन करताना भगवा झेंडा गाडीवर लावण्यास सांगितले होते. मात्र, मोदींनी केलेली कृती ही चर्चेचा विषय ठरत आहे.
https://x.com/PTI_News/status/1884511456865181810?t=UjgbxbHIGtKW1MMQrFYMqg&s=19
Leave a Reply