Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

कविता कृष्णमुर्ती , शुभा खोटे , अनुपम खेर यांना ‘पीफ’चे पुरस्कार जाहीर

पुणे : पुण्यात २३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट (पीफ) महोत्सव २०२५” चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यकर्माचा उदघाटन सोहळा श्री गणेश कला क्रीडा रंगमंच ,स्वारगेट येथे १३ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. या महोत्सवाचे उदघाटन सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते होणार आहे., अशी माहिती महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी दिली आहे.

पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे. याप्रसंगी ज्येष्ठ चित्रपट समीक्षक व चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते, चित्रपट निवड समितीचे सदस्य अभिजीत रणदिवे, उपसंचालक विशाल शिंदे (प्रोग्रॅम व फिल्म), उपसंचालक अदिती अक्कलकोटकर (आंतरराष्ट्रीय संपर्क व समन्वय) उपस्थित होते.

यंदाची थीम ही ‘’शो मॅन ; राज कपूर’’ जन्मशताब्दी आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे व ज्येष्ठ अभिनेते पद्मभूषण अनुपम खेर यांना ‘पीफ डिस्टींग्वीश अॅवार्ड’, तर ज्येष्ठ गायिका पद्मश्री कविता कृष्णमूर्ती यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी संगीतकार एस. डी. बर्मन पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

यावेळी महोत्सवाच्या आंतरराष्ट्रीय ज्यूरींच्या नावाची घोषणा अभिजित रणदिवे यांनी केली. यामध्ये मार्को बेकिस – चिली-इटालियन चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक, मार्गारिवा शिल – पोर्तुगीज चित्रपट दिग्दर्शक आणि शिक्षिका,पेट्री कोटविचा – फिनिश चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक , तामिन्हे मिलानी – इराणी चित्रपट दिग्दर्शक , जॉर्जे स्टिचकोविच – सिनेमॅटोग्राफर सर्बिया, सुदथ महादिवुलवेवा – श्रीलंकन चित्रपट दिग्दर्शक, अर्चना – दक्षिण भारतीय अभिनेत्री,अनिरुद्ध रॉय चौधरी – भारतीय चित्रपट दिग्दर्शक यांचा समावेश आहे.

समर नखाते म्हणाले या महोत्सवात फिल्म सिटीच्या एमडी – स्वाती म्हसे पाटील यांचे चर्चासत्र – १४ फेब्रुवारी आणि प्रसिद्ध माहितीपट दिग्दर्शकांशी चर्चा (उमेश कुलकर्णी, अनुपमा श्रीनिवासन, सर्वनिक कौर, कुलदीप बर्वे – १५ फेब्रुवारी) हे वर्कशॉप होणार आहेत.

ज्येष्ठ साहित्यसम्राट विजय तेंडूलकर स्मृती व्याख्यान – बोमन इराणी – १६ फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे .सिनेमा अँड सोल ; तपन सिन्हा – (स्वपनकुमार मल्लिक आणि गौतम घोष – १७ फेब्रुवारी), Ai फिल्म्सच्या माध्यमातून चित्रपटाच्या आशयाची निर्मिती – पॅको टोरेस (१८ फेब्रुवारी) आणि मराठी पॅनल: मराठी चित्रपटातील आव्हाने: निर्मिती ते प्रेक्षक: (परेश मोकाशी, आदित्य सोरपोतदार, आदिनाथ कोठारे, सुनील फडतरे १९ फेब्रुवारी). हे मास्टरक्लास संपन्न होईल.

  • १३ ते २० फेब्रुवारीदरम्यान ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट (पीफ) महोत्सव २०२५’ होणार आहे. सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन (६ स्क्रीन), कॅम्प परिसरातील आयनॉक्स (३ स्क्रीन) आणि औंध भागातील वेस्टएंड मॉलमधील सिनेपोलीस चित्रपटगृहात (२ स्क्रीन) या तीन ठिकाणी एकूण ११ स्क्रीनवर चित्रपट दाखविले जाणार आहेत.महोत्सवासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया www.piffindia.com या महोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू झाली असून, चित्रपटगृहांवर स्पॉट रजिस्ट्रेशन प्रक्रियाही सुरू झाली आहे. रसिक प्रेक्षकांसाठी कॅटलॉग फी. रुपये ८०० फक्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »