पुणे : श्रीक्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराजाचे अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. रात्री जेवण केल्यानंतर त्यांनी झोपायला गेले, त्यानंतर सकाळी घरातले उठवायला गेल्यानंतर त्यांनी दार उघडले नाही. नंतर दार तोडले मात्र त्यांनी उपरण्याच्या सहायाने आत्महत्या केल्याचे समोर आले. आर्थिक विवंचनेतुन हे पाऊल उचलल्याचं सुसाईड नोट मध्ये नमूद करण्यात आलं आहे.
वीस दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता, तर एप्रिल महिन्यात त्यांचा विवाह होणार होता. त्यांचा नुकताच साखरपुडा झाला होता, तर 20 फेब्रुवारीला त्यांचा विवाह होणार होता.मात्र, त्या अगोदरच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे.
काही दिवसांपूर्वीच शिरीष महाराज मोरे यांनी नुकतेच नवीन घर बांधलेले होते. मोरे यांनी पंख्याच्या हुकाला उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Leave a Reply