पिंपरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर होते. पोलीस आयुक्तालायचे भूमिपूजन आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले. मात्र पोलीस आयुक्तलयाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात पिंपरी चिंचवडच्या विकासावरून चांगलेच शाब्दिक वॉर झाल्याचे पहायला मिळाले.
*काय म्हणाले महेश लांडगे *
पिंपरी चिंचवड शहराची खरी ओळख 2014 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून झाली. तुम्ही मुख्यमंत्री असताना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तायाला मंजुरी दिली आणि आज तुम्ही मुख्यमंत्री असताना याचा भूमिपूजन सुद्धा होत असल्याचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी अजितदादासमोर सांगितले. त्यामुळे कार्यक्रमाचे वातावरण बदलल्याचे पहायला मिळाले.अजितदादांचे उत्तर..
मात्र त्यांतर अजितदादा पवार हे भाषण करण्यासाठी उठले आणि त्यांनी सगळंच काढले. ते म्हणाले की, आता महेशने सांगितलं त्याला काय वाईट वाटलं माझं नाव घ्यायला मला माहिती नाही. परंतु अख्ख्या पिंपरी चिंचवडला माहित आहे. 1992 ला मी तुमचा खासदार झालो 92 ते 2017 कोणी पिंपरी चिंचवड सुधारवलं. आज 25 वर्ष झाली प्रत्येक गोष्ट मी पिंपरी चिंचवड मध्ये लक्ष देऊन करत असतो. इथल्या अधिकाऱ्यांना विचारा या इमारतींमध्ये मी किती वेळा येतो किती वेळा चौकशी करतो आणि किती वेळा बसतो. शेवटी आपण महायुतीमध्ये आहोत त्यामुळे ज्यांनी चांगलं केलं त्याला चांगले म्हणायला शिका. एवढाही कंजूषपणा दाखवू नका. मी दिलदार है ज्याने केलं त्याला त्याच क्रेडिट देत असतो, असे उत्तर अजितदादांनी महेश लांडगे यांना दिले. त्यामुळे आजच्या कार्यक्रमात दोन्ही दादांच्या श्रेय वादाची चर्चा असल्याचे ऐकायला मिळाले.
Leave a Reply