सोलापूर : प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला सोलापुरात मारहाण करण्यात आल्याची माहिती स्वतः या मोरे यांनी सोशल मिडीयाद्वारे दिली होती. आता या प्रकरणी सोलापूर शहरातील बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तन्वीर शेख आणि त्याच्या अन्य 10-12 साथीदार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेल मॅनेजरच्या तक्रारीवरून सोलापूरच्या सदर बाजार पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम 115(2), 189(2), 190, 191 (2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर शहर पोलिसांनी प्रणित मोरेला जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं आहे, पण ते आले नाही तसेच, प्रणित मोरेचा शो ज्या हॉटेलमध्ये झाला, त्या हॉटेल मॅनेजरच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे.
- काय होतं प्रकरण
प्रणित मोरे याने एका कार्यक्रमात स्काय फोर्स फेम अभिनेता वीर पाहारीयावर विनोद केले होते. त्याचा राग मनात धरून सोलापूरमधील वीर पहारिया समर्थकांनी मारहाण केली होती. कॉमेडीयन प्रणित मोरे हा कॉमेडी शोसाठी 2 फेब्रुवारी रोजी सोलापूर शहरात आले होते. शो संपल्यानंतर फोटो शेसन सुरू असताना दहा ते बारा जणांच्या गटानं हल्ला केल्याची माहिती स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेनं आपल्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केली होती . पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यावर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नसल्याची माहितीही प्रणित मोरेनं आपल्या पोस्टमधून दिली होती. अशातच आता याप्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली असून 10 ते 12 जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळत आहे. - प्रणित मोरेंन वीर पहारियाबाबत कॉमेडी केली होती-
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नातू व अभिनेता वीर पहाडिया यावर अप्रत्यक्षपणे स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे यांनं सोलापुरात एका कार्यक्रमात जोक केला होता. त्यामुळे कार्यक्रमात उपस्थित असलेला एक गट नाराज झाला. त्यातून मारहाणीचा प्रकार घडला. या बाबतीत कॉमेडीयन प्रणित मोरे याने इंस्टाग्रामवरून पोस्ट करतं माहिती दिली होती, तर वीर पहाडियानं देखील दिलगिरी व्यक्त केली होती
Leave a Reply