Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

महायुतीच्या बातम्या द्या, न्हायतर तुम्हाला उडवून टाकू : अजित दादांची एके 47 हातात घेत मीडियावर मिश्किल टिपण्णी

पुणे : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पुणे दौऱ्यावर होते. त्यातील दोघांनी चाकण परिसरात असणाऱ्या आधुनिक क्षेपणास्त्र संकुलाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी दोघांनी हातात ak ४७ हातात धरून अनेकांवर निशाणा साधला. दोघांनी त्यांच्या नजरेत असणाऱ्यांवर नेम धरला. अजित दादांनी तर थेट मीडियाचे प्रतिनिधी आणि कॅमरामेनचा एके 47ने वेध घेतला. महायुतीच्या चांगल्या बातम्या द्या, अन्यथा आम्ही दोघे तुम्हा सर्वांना उडवून टाकू. अशी मिश्किल टिपणी अजितदादांनी यावेळी केली. त्यामुळे एकच हशा पिकल्याचे पाहायला मिळाले.

पुण्याच्या चाकणमध्ये आधुनिक क्षेपणास्त्र संकुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालं. त्यावेळी दोघांनी एके 47 चा अनुभव घेतला अन त्यामार्फत अनेकांवर निशाणा साधला.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पिंपरी चिंचवड परिसरातील अनेक विविध कामांचे भूमिपूजन आणि उदघाटन त्यांनी केले. त्यात पिंपरी चिंचवड येथे देशातील सर्वात आधुनिक मुख्यालय होणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. मात्र ak ४७ च्या किस्स्याने सर्वांनाच दादांनी खळखळून हसवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »