पुणे : लोकांची मानसिकता आजकाल कोणत्या थराला चालली आहे हे सांगणे अवघड झाले आहे. त्यातच पुण्याच्या दौंड मधून मन हेलावणारी बातमी समोर आली आहे. एका विवाहितेने आपल्या पोटच्या दोन चिमुकल्यांचा गळा दाबून खून केला. त्यानंतर आपल्या पतीवर देखील कोयत्याने वार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण पुणे जिल्हा हादरला आहे.
शंभू दुर्योधन मिंढे (वय ०१) आणि पियू दुर्योधन मिंढे (वय ०३) अशी मृत झालेल्या चिमुकल्यांची नावे असून दुर्योधन मिंढे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली मधील शिंदे वस्ती या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली असून दौंड पोलिसांनी या आरोपी कोमल दुर्योधन मिंढे (वय 30 ) हिला अटक केली आहे.
आज शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असून घटनेची माहिती मिळताच दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार आणि कुरकुंभ चौकी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे
या महिलेने तिचा पती दुर्योधन आबासाहेब मिढे वय 35 वर्ष याला देखील कोयत्याने मानेवर व हातावर वार करून जखमी केल आहे. पती-पत्नीच्या वादातून आणि सासरच्या जाचाला त्रासून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलण्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
Leave a Reply