Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

बारामतीत जीबीएस सिंड्रोमचा शिरकाव! तरुणीचा घेतला बळी, तीन आठवड्यापासून होत होता त्रास

पुणे : पुणे शहरासह जिल्ह्यात जीबीएस सिंड्रोमचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यातच अजितदादांच्या बारामतीत देखील आता या जीबीएस सिंड्रोमने एंट्री केली आहे. किरण राजेंद्र देशमुख असे मृत्यू पावलेल्या युवतीचे नाव असून तिच्या जाण्याने हळहळ व्यक्त होते आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी कि, पुण्यात पाणीपुरी खाल्यानंतर तिला जुलाब आणि अशक्तपणा जाणवू लागला. त्यानंतर ती बारामती येथील घरी आली.
गेल्या तीन आठवड्यापेक्षा अधिक काळापासून तिची या आजाराशी झुंज सुरू होती. बारामतीतील किरण ही सिंहगड परिसरात शिक्षणाच्या निमित्ताने नातेवाईकांकडे राहत होती. याच दरम्यान तिला जीबीएसची लागण झाली होती. किरण राजेंद्र देशमुख हिचे मंगळवारी तिचे निधन झाले. रात्री उशिरा बारामतीतील जळोची येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली होती. किरण ही शिक्षणाच्या निमित्ताने सिंहगड परिसरात नातेवाईकांकडे राहत होती. किरण राहत असलेल्या परिसरातही रुग्ण आढळले.

दरम्यान किरणच्या नातेवाईकांनाही अचानक त्रास जाणवू लागला आणि किरणला देखील त्रास होऊ लागला.जुलाब व अशक्तपणामुळे बारामतीत कुटुंबांकडे आलेल्या किरणला तिच्या कुटुंबीयांनी बारामतीतील तज्ञांना दाखवले. तेव्हा तज्ञांना तिच्या लक्षणावरून शंका आली आणि त्यांनी पुण्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तिला तातडीने पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले 27 जानेवारीपासून तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र तिची प्रकृती खालावत गेली आणि आज तिचे निधन झाले. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »