पुणे : झारखंडमधील रांची येथे पार पडलेल्या 68 व्या अखिल भारतीय कर्तव्य पोलीस मेळाव्यात महाराष्ट्र पोलीस टीमच्या वतीने शिरूर तालुक्यातील खंडाळे गावचे सुपुत्र व सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल नळकांडे यांनी सुवर्णपदक पटकावले आहे . याप्रसंगी झारखंडच्या सीआयडी मधील विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या शुभहस्ते राहुल यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
रांची येथे 10 ते 18 फेब्रुवारी दरम्यान अखिल भारतीय पोलीस ड्युटी मीट 2024 – 25 चे स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी घेण्यात आलेल्या ‘ सायंटिफिक एड्स टू इन्वेस्टीगेशन ” या स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस टिम व सातपूर नाशिक पोलीस ठाण्याचा संघ सहभागी झाला. यामध्ये वैयक्तिक प्रकारात सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल नळकांडे यांनी सुवर्णपदक पटकावले.
खंडाळे (तालुका शिरूर ) गावचे सुपुत्र राहुल नळकांडे हे सध्या सातपूर नाशिक पोलीस स्टेशन येथे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. अगदी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील शेतकरी पुत्र ते होत राहुल यांची प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडाळा येथे माध्यमिक शिक्षण वाघाळे ,उच्च माध्यमिक शिक्षण विद्याधाम प्रशाला शिरूर येथे झाले आहे. बीएससी ऍग्रीचे शिक्षण पुणे कृषी महाविद्यालयातुन झाले आहे आहे. सन 2014 – 15 साली एम.पी एस.सी मधून राहुल यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाली. सुरुवातीला पुणे पालघर व सिंधुदुर्ग येथे कार्यरत होते सद्यस्थिती ते नाशिक या ठिकाणी सातपूर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत आहेत. त्यांनी घवघवीत यश संपादन करत सुवर्णपदकाला गवसणी घातल्याबद्दल शिरूर तालुका व ग्रामीण भागातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.
सुवर्णपदक प्राप्तीचा आनंद द्विगुणित
दहा ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान झारखंड मधील रांची येथील 68 व्या अखिल भारतीय पोलीस ड्युटी मीट 2024 25 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी घेण्यात आलेल्या सायंटिफिक एड्स टू इन्वेस्टीगेशन या स्पर्धेत महाराष्ट्राची प्रतिनिधित्व महाराष्ट्र पोलीस टिम च्या वतीने करण्यात आले होते. यामध्ये आमची सातपूर पोलीस ठाण्याची टीम सहभागी होती व वैयक्तिक प्रकारात मला सुवर्णपदक मिळण्याबद्दल मला आनंद वाटतो आहे. ‘ सायंटिफिक एड्स टू इन्वेस्टीगेशन ” म्हणजेच गुन्हा शोधण्यासाठी न्यायवैद्यकशास्त्राची (फॉरेन्सिक सायन्स) विविध शास्त्राच्या साह्यांच्या शस्त्रांचा वापर केला जातो. या शास्त्राच्या मदतीने गुन्हेगारांना ओळखले जाते गुढ्याची वेळ व परिस्थितीचे अवलोकनही केले जाते.व जलद गुन्हा सिद्ध करण्यास मदत होते.
Leave a Reply