Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

पुण्यात पुन्हा वाहनांची तोडफोड, घटना सीसीटीव्हीत कैद

vehicle

पुणे : पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी कोथरूड परिसरात गुन्हेगारीची घटना ताजी असताना आता पुण्यातील चंदननगर परिसरात वडगाव शेरीत १५ ते २० जणांच्या टोळक्याने अनेक गाड्यांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. हातात कोयते, पालघन, लाकडी दांडके, हातात घेऊन हि तोडफोड करण्यात आली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी काही आरोपीना अटक केली असून दहशत निर्माण करण्यासाठी हि तोडफोड केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी वाढत्या गुन्हेगारीवरून पुणे पोलिसांना खडसावले होते. मात्र त्यानंतरही गुन्हेगारीवर वाचक बसला नसल्याचे पाहायला मिळत आहे. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला असून यात १० ते १५ जणांचे टोळके वाहनांची तोडफोड करताना पहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारी वाढत चालली आहे. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या अभियंत्याला मारणे टोळीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे पुणे पोलिसांसमोर या गुन्हेगारीला आळा घालण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »