Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

पोलीस आयुक्तांचा शब्द अन गजा मारणेला अटक, पोलिसांकडून थेट कारवाईला सुरुवात

पुणे : पुण्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलीसांनी थेट कारवाई करण्यास सुरवात केली आहे. याची सुरुवात पोलिसांनी कोथरूड परिसरात काही दिवसांपूर्वी खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर पुणे पोलिसांनी कुख्यात गुंड गजानन मारणे याच्यासाह त्याच्या टोळीवर मकोका लावला. त्यानंतर पोलिसांनी सायंकाळच्या सुमारास गजानन मारणे याला अटक केली आहे. त्यामुळे गुन्हेगारी विश्वाला हादरा बसला आहे. मारहाणीवेळी स्वत: गजा मारणे जरी घटनास्थळी नसला तरी टोळी प्रमुख म्हणून गजा मारणेला अटक केली आहे.

आयटी अभियंता असलेले देवेंद्र जोग हे भाजपचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचे कार्यकर्ते आहेत. त्यांना मारहाण झाल्यानंतर कोथरूड पोलिसांनी गुन्हेगारांना अटक केली होती.

ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू (३५), किरण कोंडिबा पडवळ (३१) आणि अमोल विनायक तापकीर (३५, तिघे रा. शास्त्रीनगर, कोथरूड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. चौथा आरोपी श्रीकांत ऊर्फ बाब्या संभाजी पवार हा पसार झाला आहे. त्यांच्याविरोधात यापूर्वी गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. देवेंद्र पुरुषोत्तम जोग यांनी फिर्याद दिली आहे.

*काय होती घटना *

जोग हे १९ फेब्रुवारी रोजी घरी जाताना रस्त्यावर गर्दी असल्याने ते बाजूला थांबले होते. त्यावेळी गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून चौघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी, पट्ट्याने बेदम मारहाण केली. त्यामध्ये त्यांना जबर दुखापत झाली. त्याबाबत त्यांनी वडिलांसोबत कोथरूड पोलिस ठाण्यात जात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींच्या मुसक्या आवळल्या.. देवेंद्र जोगे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे निकटवर्ती आहेत. कोथरूड पोलिसांनी मारणे टोळीतील तीन गुंडांना अटक केली आहे.

याबाबत पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी गजानन मारणे हे स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर झाले आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. मारणे यांचे वकील विजय ठोंबरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »