Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

धनंजय मुंडे राजीनामा देणार ? : करुणा मुंडेंची सूचक पोस्ट

मुंबई : मस्सजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात नुकतेच आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या रोप पत्रात अनेक गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे. या आरोपपत्रात वाल्मिक कराड या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे राज्यात एकाच खळबळ उडाली आहे. हे आरोपपत्र दाखल झाल्यानंतर अनेक राजकीय घडामोडिंना वेग आला आहे. त्यातच करूना मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार असल्याची फेसबुक पोस्ट केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

https://www.facebook.com/share/p/1QCsgxEnhn/?mibextid=wwXIfr

करुणा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट केल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. वाल्मीक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचं समोर आल्यानंतर विरोधक तसेच करुणा शर्मा यांच्याकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आता करुणा शर्मा यांच्या या फेसबुक पोस्टमुळे चर्चांना उधाण आलं आहे. सोमवारपासून (३ मार्च) विधीमंडळाचं अधिवेशन सुरु होत आहे, त्यापूर्वीच धनंजय मुंडे आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचं करुणा शर्मा यांनी सांगितलं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »