मुंबई : मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. न्यायालयामध्ये चार्ट शीट दाखल झाल्यानंतर संतोष देशमुख यांना कशाप्रकारे मारहाण केली याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे फोटो पाहून संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्यानंतरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेऊन धनंजय मुंडे यांच्या राजीनामाची मागणी केली होती. त्यानुसार आज सकाळी विधिमंडळाचे कामकाज सुरू होण्याच्या अगोदर धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली असून धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्याचे मागणी जोर धरू लागली आहे. तसेच सातापुडा बंगल्यावर धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर खंडणीबद्दल झालेल्या बैठकीच्या चौकशीची मागणी सुरेश धस यांनी केली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगले चर्चेत होते. धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक असलेले वाल्मीक कराड यांचा या हत्यामध्ये सहभाग असल्याचे समोर आले होते. तसेच पोलिसांनी वाल्मीक कराड यांना या घटनेमध्ये मुख्य आरोपी केले होते. वाल्मीक कराड धनंजय मुंडे यांचा अत्यंत निकटवर्ती असल्याची माहिती देखील समोर आली होती. मात्र सोशल मीडियावर मारण्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळलेली आहे.
दोन महिन्यांपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनामाची मागणी केली जात होती. अखेर 82 दिवसानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. धनंजय मुंडे आणि त्यांच्या पीए मार्फत आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त केला आहे.
Leave a Reply