Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

देवदर्शनासाठी जातं असताना ताम्हिणी घाटात कार चालकाचे नियंत्रण सुटले, थेट एसटीला धडक, मुळशीतील दोघांचा जागीच मृत्यू

पुणे : ताम्हीणी घाटात भीषण अपघात झाल्याची घटना आमोर आली आहे. एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर यात तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. कारमधून देवदर्शसाठी हे निघाले असल्याची माहिती समोर आली आहे. चालक मानस साहू आणि सखुबाई तुकाराम कानगुडे अशी मृत व्यक्तिची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारच्या सुमारास साहू कुटुंब स्विफ्ट कारने देवदर्शनासाठी निघाले होते. पाली गावाजवळ आल्यावर खेड – चिंचवड ही एसटी बस पुण्याच्या दिशेने जातं असताना वेळे गावाच्या दिशेकडून कार येत होती. या मार्गावर उतार असल्याने कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार थेट समोर असलेल्या एसटी बसला जाऊन धडकली. या कारची धडक एवढ्या जोरात होती की, यात कारच्या बाहुणे भाग बसच्या आता गेल्याने वाहन चालक आणि कारमध्ये बसलेल्या व्यक्तीचा जागेवरचं मृत्यू झाला आहे.

अपघातानंतर दोन्ही मृतदेह कारमध्येच अडकून पडले होते. घटनेची माहिती समजताच सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे सदस्य घटनास्थळी जाऊन त्यांनी आधुनिक साधनांच्या सहायाने अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. जखमीवर माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमीमध्ये एका लहान मुलीचा देखील समावेश आहे.

अपघाताची माहिती मिळताच विळे दूरक्षेत्र पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राठोड व पोलीस विनोद तांदळे घटनास्थळी पोहोचले. तसेच येथील तुषार कदम व राकेश दगडे यांनी देखील घटनास्थळी जाऊन मदतकार्य सुरू केले. माणगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे हे देखील रेस्क्यू टीम सोबत घटनास्थळी पोहचले आहेत.

अपघात झालेल्या कार मधील सार्वजण मुळशी तालुक्यातील शिंदेवाडी येथील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांची नावे समोर आली नसली तरी ते मुळचे उडीसा राज्याचे असल्याची माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »