पुणे : पुण्यातील येरवडा परिसरामध्ये असणारे शास्त्रीनगर भागात गौरव आहुजा नावाच्या एका मध्यवंदा अवस्थेत असलेल्या तरुणाने सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यात लघुशंका केली. तसेच अश्लील कृत्य देखील केले. अत्यंत मग्रुरीत त्याने हे कृत्य केले होते. मात्र संध्याकाळी त्याला याची उपरती झाली असून त्यांनी एका व्हिडिओद्वारे सकाळी घडलेल्या प्रकाराची माफी मागितली आहे. त्याचा एक व्हिडिओ समोर आला असून लवकरच तो पोलिसांना शरण जाणार असल्याचे या व्हिडिओत म्हटले आहे.
महिला दिनाच्या दिवशीचा सांताजनक प्रकार घडल्याने सर्वसामान्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांनी केलेल्या या प्रकारामुळे त्याचे वडील मनोज अहुजा देखील संतापले होते. त्यांनी माध्यमांची प्रतिक्रिया देताना माझ्या मुलाने सिग्नलवर नाही तर माझ्या तोंडावर लघुशंका केली आहे. अशी प्रतिक्रिया दिली.
एमएच 12 आरएफ 8419 या रजिस्ट्रेशन नंबरच्या बीएमडब्ल्यू 6 सीरिज या लक्झरी गाडीतून आलेल्या तरूणाने श्रीमंतीचा माज दाखवत, कोणताही विधीनिषेध न बाळगता भर रस्त्यात दिवसाढवळ्या लघूशंका केली. विशेष म्हणजे जाब विचारायला गेलेल्यांसमोर पुन्हा त्याने हे विकृत कृत्य केलं होत. गौरव आहुजाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तो फरार झाला होता. त्याचा मित्र भाग्येस नीबजीया सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.
याबाबत प्रत्यक्षदर्शी असलेल्या सुनील शिरसाट यांनी सांगितलं की, शास्त्रीनगर चौकामध्ये आहोत, या ठिकाणी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एक बीएमडब्ल्यू कार चालवणारा आला होता. त्याने अश्लील चाळे करून, भर रस्त्यात त्याने लघुशंका केली. तो आणि त्याचा मित्र होता. मी त्यांना विचारल्यानंतर ते फुल स्पीडने वाघोलीकडे गेले. त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. असे शिरसाट यांनी सांगितले.
Leave a Reply