पुणे : बड्या बापाच्या मुलाने येरवडा येथील शास्त्रीनगर चौकात लघुशंका करत अश्लील चाळे करणाऱ्या गौरव अहुजा आणि त्याच्या मित्राची येरवडा पोलिसांनी त्याच ठिकाणाहून धिंड काढली आहे. पोलिसांनी या बड्या बेट्याचा माज उतरवला आहे. शास्त्रीनगर चौकात रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवून या तरुणाने लघुशंका केल्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलंच व्हायरलं झाला होता. त्यामुळे संतापाची ळात उसळली होती. घटनेच्या काही तासानंतर गौरव अहुजा हा कराड पोलिसांना संरेंडर झाला होता. तसेच त्याने सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करून माफी मागितली होती.
काय होता प्रकार
येरवडा परिसरात असणाऱ्या शास्त्रीनगर चौकात दारूच्या नेशेत एका बड्या व्यक्तीचा मुलगा गौरव अहुजा याने लघुशन्का केली आणि त्यानंतर व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीसमोर भर रत्यासावर अश्लील चाळे केले होते. याचे व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्यनंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता. त्यांनंतर पोलिसांनी त्याच्या वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी आपण कराड पालिसांना शरण येत असून सर्व पुणेकरांची माफी मागतो, मला एक संधी द्या असा व्हिडिओ व्हायरल केला. त्यानंतर येरवडा पोलिसांनी त्याचा ताबा घेतला असून सोमवारी त्याने ज्या ठिकाणी हे कृत्य केले होते. त्याचं ठिकाणाहून त्याची आणि त्याच्या मित्राची धिंड काढत त्याचा माज उतरवला आहे.
न्यायालयीन कोठडी
या प्रकरणी गौरव आणि त्याचा मित्र भाग्येश यांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोघांनाही एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. ही कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही न्यायालयात हजर असता पुणे सत्र न्यायालयाने गौरव आहुजाला एक दिवसाची पोलीस कोठडी तर भाग्येश ओसवाल याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
Leave a Reply