Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

नशेसाठी पैसे न दिल्याने उच्चशिक्षित तरुणाने पेटवल्या 13 दुचाकी, सीसीटीव्हीत घटना समोर

पुणे : पुण्यातील भर रस्त्यात लघुशंका आणि अश्लील कृत्य करणाऱ्या गौरव अहुजाची घटना ताजी असताना पिंपरी चिंचवडमधून समोर आली आहे. नेशसाठी आईने पैसे दिले नाही म्हणून मुलाने रागाच्या भरात सोसायंटीमधील 13 दुचाकी जाळल्याचा प्रकार समोर आला आहे.

स्वप्नील शिवशरण पवार असे या नशेबाज तरुणाचे नाव असून पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळेनीलख भागात हा प्रकार घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील पवार हा तरुण उच्चं शिक्षित आहे. मात्र तो मोठ्या प्रमाणावर व्यवसानाच्या आहारी गेला आहे. आईने नशेसाठी पैसे न दिल्याने त्याला राग अनावर झाला आणि त्याने रागाच्या भरात सोसायटीमधील वाहने पेटवून दिली. दुचाकीना अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचे मध्यरात्री समजल्यानंतर सोसायटीतील सिसिटीव्हीमध्ये ही वाहने सोसायटीमध्ये रहिवाशी असलेल्या स्वप्नील पवार याने पेटवल्याचे दिसून आले. त्यानंतर सोसासटीमधील नागरिकांनी त्याच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर सांगवी पोलिसांनी त्यास अटक केली आहे.

याबाबत संबंधित मुलाच्या पालकांनी देखील पोलिसांकडे तक्रार केली आहे. आमचा मुलगा उच्चशिक्षित आहे. मात्र तो व्यसनाच्या आहारी गेल्याने असे कृत्य करतो तसेच पैसे न दिल्यास कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याचे स्वप्नीलच्या आईने म्हटले आहे. त्याला सोडू नका अन्यथा तो आणखी असेच उद्योग करेल, अशी विनंतीही त्याच्या आईने पोलिसांकडे केली आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढतांनाच पहायला मिळत आहेत. मात्र अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी पोलिसांनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »