Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

पुण्यात सोसायटीत शिरलेल्या टोळक्याचा डाव कुत्र्याने उधळला

पुणे : पुणे शहरातील वानवडी येथील जगताप चौकात असलेल्या आलिशान सोसायटीत पहाटेच्या सुमारास चार ते पाच जणांच्या टोळक्याने कोयते आणि शस्त्रांसह सोसायटीत चोरीच्या उद्देशाने प्रवेश केला होता. मात्र, सोसायटीतील कुत्र्याच्या भुंकण्याने हा कट फसला आणि संशयित आरोपी पळून गेले.

ही संपूर्ण घटना सिसिटीव्हीमध्ये कैद झाली असून या सीसीटीव्हीमध्ये हे टोळके पार्किंगमध्ये आणि जिन्याजवळ फिरताना स्पष्ट दिसत आहेत. काहीजण हातात शस्त्रे घेऊन परिसराची रेकी करत असल्याचेही आढळून आले आहे.

हा संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर सोसायटीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रहिवाशांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली असून, लवकरात लवकर या संदर्भात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »