पुणे : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचा आलेख वाढताना पाहायला मिळत आहे. त्यातच पुण्यातील चंदननगर परिसरात एका उच्चं शिक्षित बापाने आपल्या पत्नीवर असलेल्या चारित्र्याच्या संशयावरून आपल्या तीन वर्षांच्या चिमुरड्याचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने पुणे पुन्हा हादरले आहे.
घेतले.हिम्मत माधव टीकेटी (वय ३.५ वर्षे) असे मृत मुलाचे नाव असून माधव टिकेटी असे बापाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळलेली माहिती अशी की, टिकेटी पती पत्नी हे दोघेही उच्चं शिक्षित आहेत. मात्र त्यांच्यात नेहमीच भांडणे होत होती. माधव टिकेटी याला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यातूनच त्यांची भांडणे झाली. यानंतर रागाच्या भरात माधव टिकेटी चांदननगर येथे असलेल्या जंगलात आपल्या मुलाला घेऊन गेला आणि तिथे त्याचा गळा चिरला. आपला मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार आईने पोलिसात दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाला सुरवात केली.
त्यानुसार पोलिसांनी मृत मुलाचे वडील माधव यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्या बोलण्यात ताफावत आढळली. त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने आपण केलेल्या कृत्याची कबुली दिली. पत्नीवर असलेल्या संश्याच्या रागातून आपण हे कृत्य केल्याचे त्याने सांगितले.
टिकेटी कुटुंबं हे उच्चं शिक्षित असून काही दिवसांपासून पती आणि पत्नीत वाद सुरु होते. ते मूळचे बाहेर राज्यातील असून कामनिमित्त चंदनगर परिसरत ते राहतात. मुलीला आणायला जातो असे सांगून तो मुलाला घेऊन बाहेर पडला पण रात्री शिरा पर्यंत घरी आला नाही. त्यामुळे पत्नीने पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर त्याला एका लॉजमधून अटक केली असून गुन्ह्यांची त्याने कबुली दिलेली आहे.
Leave a Reply