Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

सासूच्या छळाला कंटाळून विवाहितेची राहत्या घरी आत्महत्या, पुरंदर तालुका हळहळला

पुणे : राज्यात महिलांना विविध क्षेत्रात आदराचे स्थान मिळत असताना ग्रामीण भागात अजूनही सूनाच्या छळाचे प्रकार घडतं आहेत. अशीच एक मन हेलावणारी घटना पुरंदर तालुक्यातील नीरा येथे येथे घडली आहे. सासूने सुनेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याने एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

नीता सचिन निगडे (वय ३३) असे विवाहितेचे नाव असून याप्रकरणी जेजुरी पोलिसांनी सासू विजया भगवान निगडे हिला अटक केली आहे. सासूला सासवड न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असून तीची आता यरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. याबाबत नीता निगडे यांचे वडील सुभाष शंकर माने रा. श्रीगोंदा (ता.आहिल्यानगर) यांनी जेजुरी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, काही वर्षांपूर्वी सचिन आणि नीता यांचा विवाह झाला होता. नीता यांना दोन मुली व एक मुलगा आहे. मात्र सासू विजया निगडे – जगताप या नीता यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करणे, सतत शिवीगाळ करणे, गरीब असल्याने हिनवणी करणे, मुलगा होत नाही म्हणून घालून पाडून बोलणे, नीताच्या साड्या जाळून टाकणे, नवीन फ्लॅट घेतलाय राहायला जाण्याआधी त्यासाठी माहेरून एक लाख रुपये आण म्हणून तगादा लावणे अशा प्रकारचा शारीरिक व मानसिक त्रास देत होती. अखेर या त्रासाला कंटाळून नीता यांनी नीरा येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना 22मार्च रोजी घडली होती. त्यानंतर सासू विजया निगडे यांना अटक करून त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी अधिक तपास करत आहेत.

नीता यांनी रहत्या घरी गळफास घेतल्यानंतर नीरा व जेजुरी पोलिसांना तात्काळ घटनास्थळी भेट देत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न केले. माहेरचे लोक नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रात व नीरा पोलीस दुरक्षेत्रात आल्यावर प्रचंड संतापले होते. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन नीरेचे फौजदार सर्जेराव पुजारी, घनशाम चव्हाण, हरिश्चंद्र करे यांनी माहेरच्यांची समजूत काढत कायदेशीर कारवाई करू असे आश्वासन दिले. अंत्यविधी वेळी ही मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »